
सोशल मीडियावर रील्स बनवणे तीन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. रील्स बनवत असताना स्कॉर्पिओ कार अनियंत्रित झाली आणि थेट कालव्यात पडली. कारमधील तीन तरुण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेत कालव्यातून कार बाहेर काढली. अहमदाबादमधील सरखेज परिसरात फतेहवाडी कालव्याजवळ ही घटना घडली.
यक्ष, यश आणि क्रिश अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. या तरुणांच्या अन्य मित्रांनी रील्ससाठी चार तासांसाठी 3500 रुपये देऊन भाड्याने स्कॉर्पिओ कार आणली होती. या कारमध्ये यश, यश आणि क्रिश रील्स बनवत होते. यादरम्यान कार अनियंत्रित झाली आणि थेट कालव्यात पडली. मित्रांना बुडताना पाहून अन्य मित्रांनी रस्सी टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अयशस्वी झाला. पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने तिघेही वाहून गेले.
स्थानिकांनी पोलीस आणि रेस्क्यू टीमला माहिती दिली. रेस्क्यू टीमकडून फतेहवाडी कालव्यात बेपत्ता तरुणांचा शोध सुरू आहे.