
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, विकृत मानसिकतेच्या आणि महिलांना नग्न फोटो पाठविणाऱ्या मंत्री जयकुमार गोरेंचा राजीनामा घ्या. तसेच सावंत, अबू आझमींवर कारवाई करा, अशी घोषणाबाजी करीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने निषेध आंदोलन केले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, तानाजी सावंत, अबू आझमी, वाल्मीक कराड यांना प्रतीकात्मक जोडे मारण्यात आले. तसेच त्यांच्या फोटोला शेण फासून निषेध करण्यात आला.
गुडलक चौकात झालेल्या या आंदोलनाला शिवसेना शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, महिला सहसंपर्क संघटिका कल्पना थोरवे, उपशहरप्रमुख प्रशांत राणे, शहर संघटक राजेंद्र शिंदे, कार्यालयीन सचिव मकरंद पेठकर, उमेश वाघ, विभागप्रमुख प्रवीण डोंगरे, मुकुंद चव्हाण, महेश पोकळे, संतोष भुतकर, गोविंद निंबाळकर, राजेश मोरे, अतुल दिघे, अजय परदेशी, विलास सोनवणे, प्रसिद्धिप्रमुख अनंत घरत, युवासेना शहर संघटक राम थरकुडे, युवराज पारिख, चेतन चव्हाण, परेश खांडके, गिरीश गायकवाड, महिला आघाडीच्या अमृता पठारे, ज्योती चांदेरे, सुनीता खंडाळकर, गौरी चव्हाण, रेखा कोंडे, विद्या होडे, मृण्मयी लिमये, करुणा घाडगे, सोनाली जुनवणे, स्वाती कथलकर, विजया मोहिते, रोहिणी कोल्हाळ, सुनीता दगडे, स्नेहल पाटोळे, वैशाली कापसे, संजय वाल्हेकर, अनिल परदेशी, अमर मारटकर, ज्ञानंद कोंढरे, आशितोष मोकाशी, नितीन निगडे, गणेश घोलप, नागेश खडके, राहुल शेडगे, शशिकांत सटोटे, आरोग्य सेनेचे रमेश क्षीरसागर, श्याम कदम, जुबेर तांबोळी, दिलीप पोमण, जुबेर शेख, अफाक शेख, दीपक चावरिया, रमेश जुनवणे, प्रकाश धामणे, प्रकाश चौरे, हेमंत यादव, कैलास बांदल, संजय गवळी, नीरज नांगरे, मयूर कोंडे, अक्षय हबीब, ओंकार मारणे, गणेश वायाळ, मोहन पांढरे, शैलेश जगताप, संतोष होडे, राजेंद्र खंडाळकर, आशिष अढळ, ओंकार मारणे, अमोल घुमे, नितीन दलभंजन आदी उपस्थित होते.