
हिरवाई जपणारे शहर म्हणून ठाण्याचा नेहमी उल्लेख केला जातो. पण घोडबंदर रोडवरील 1 हजार 647 झाडांची ठाणे महापालिका लवकरच कत्तल करणार आहे. त्यामुळे कापूरबावडी ते गायमुख रोडवरील हरितपट्टाच संपुष्टात येणार असून निसर्गाचीही मोठ्या प्रमाणावर हानी होणार आहे. एवढ्या मोठ्या संख्येने झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. घोडबंदर मार्गावरील वाहतूककोंडी फोडण्यासाठी सर्व्हिस रोड मुख्य रस्त्याला जोडण्याचे काम हाती घेण्यात आले असून त्याच्या आड एक हजाराहून अधिक झाडे येत आहेत. या झाडांवर कुऱ्हाड पडणार असून त्याची निविदादेखील काढली आहे.
549 वृक्षांचे पुनर्रोपण त्याच ठिकाणी
प्रकल्पासाठी रस्त्याच्या दुतर्फा असलेली मोठमोठी झाडे तोडावी लागणार आहेत. यासाठी पालिका खर्च करणार असून प्रकल्पात बाधित होणाऱ्या 1 हजार 646 वृक्ष तोडणे व 549 वृक्षांचे त्याच ठिकाणी पुनर्रोपण करून त्यांची निगा, देखभाल करण्याबाबतची निविदा मागवली असल्याची माहिती वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्याने दिली.
एमएमआरडीएने याबाबतचा प्रस्ताव ठाणे महापालिका प्रशासनाला पाठवला आहे. त्यानुसार कापूरबावडी ते गायमुख हा 9.30 कि.मी. लांबीचा रस्ता संपूर्णपणे काँक्रट करण्याचा मानस आहे. त्यासाठी 560 कोटींहून अधिक खर्च अपेक्षित धरला आहे.
प्रत्येकी चार असे एकूण आठ पदरी रस्ते होणार असून त्याचे काँक्रीटीकरण केले जाणार आहे. घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी सुटणार असली तरी मोहवणारी हिरवाई मात्र नष्ट होणार आहे.
सुविधाकारण्याचा विचार कर वा वाहक व्यवस्था व इतर पायात समिती गठित करावी. कोणत्याही परिस्थितीत वृक्षतोड करू नये. – रोहित जोशी (पर्यावरणप्रेमी)