एमएमआरमध्ये पैसे दिल्याशिवाय आयुक्त बनू शकत नाही, रईस शेख यांचा आरोप

मुंबई महानगर प्रदेशात पैसे दिल्याशिवाय कोणीही आयुक्त बनू शकत नाही, असा गौप्यस्फोट समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आज विधानसभेत केला. त्यामुळे पुन्हा एक नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना त्यांनी हा आरोप केला. मुंबई महानगर प्रदेशात पैसे दिल्याशिवाय कोणीही आयुक्त बनू शकत नाही. अशा स्वरूपाचा कारभार नगर विकास विभागात आहे. जे आयुक्त आले त्यांनी विकास आराखडा बनविला त्याचा प्रादेशिक विकास आराखडय़ास कसलाही ताळमेळ नाही. फक्त दुकान उघडून बसले आहेत. अशा स्वरूपाची जर आपण शहरे निर्माण करत असू तर महाराष्ट्राचे 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही, याकडे रईस शेख यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.