
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सुधाकर बडगुजर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
नाशिक जिह्यातील नियुक्तीही जाहीर करण्यात आली असून डी. जी. सूर्यवंशी यांची नाशिकच्या जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.