ठाणे-बोरिवली बोगद्याच्या कामाला विरोध का? हायकोर्टाने निकाल राखून ठेवला

ठाणे-बोरिवली बोगद्याच्या बांधकामासाठी मेघा इंजिनीअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (एमईआयएल) या कंपनीने परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र दिल्याचा आरोप चुकीचा असून याचिकाकर्त्यांचा याच्याशी संबंध काय? तसेच या कामाला विरोध करण्यामागे याचिकाकर्त्यांचा हेतू काय, असा सवाल एमईआयएलच्या वकिलांनी आज हायकोर्टात केला. सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर न्यायालयाने या प्रकरणावरील निकाल राखून ठेवला. एमएमआरडीएकडून ठाणे ते बोरिवलीदरम्यान बोगदा तयार केला जाणार असून या बोगद्याच्या बांधकामासाठी एमईआयएल या कंपनीने परदेशी बँकेचे बनावट हमीपत्र दिल्याचा आरोप करत ज्येष्ठ पत्रकार व्ही. रवी प्रकाश यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित दाखल केली आहे.