
किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी सुरू झालेले शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. आज ट्रॅक्टर मोर्चा घेऊन चंदिगडमध्ये घुसण्यासाठी निघालेले शेतकऱ्यांचे वादळ चंदिगड पोलिसांनी पंजाब आणि चंदिगड सीमेवर रोखले. ठिकठिकाणी बॅरीकेड्स लावले. तसेच तब्बल 100 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आजपासून चंदिगडमध्ये धरणे आंदोलन सुरू करण्याची घोषणा शेतकऱ्यांनी केली होती. परंतु चंदिगड प्रशासनाने शेतकऱ्यांना चंदिगडमध्ये धरणे आंदोलनाची परवानगी नाकारली. मोहाली येथे रोपड जिह्यातून आलेल्या 100 शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. त्यांचे 15 ट्रक्टर्सही ताब्यात घेण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी ट्रक्टरच्या नंबर प्लेटवर खुणा केल्या आहेत, जेणेकरून सीसीटीव्ही पॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवता येईल. शेतकऱ्यांना जिथे रोखण्यात आले आहे तिथेच रस्त्याच्या बाजूला बसून राहण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत.