…म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली

प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात मौनी आमावस्येच्या दिवशी सरकारी आकडेवारीनुसार 30 भाविकांचा चेंगरून मृत्यू झाला. त्यानंतर सरकारच्या ढिसाळ व्यावस्थानाविरोधत विरोधकांनी हल्ला चढवला. परंतु उत्तर प्रदेशातील भाजप सरकारने मृतांची खरी आकडेवारी सादर करण्याचे धाडस केले नाही. अखेर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थिती चिघळू नये म्हणून चेंगराचेंगरीची माहिती लपवली असल्याची कबुली दिली आहे.

आयआयएम अधिकारी आणि टपाल सेवेच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना योगी यांच्या तोंडून सत्य बाहेर आले. उलटसुलट बातम्यांमुळे तिथे असलेले आठ कोटी भाविकही घाबरले असते. तेव्हा कुंभमेळ्यात सुमारे चार कोटी भाविक होते. अशा कठीण परिस्थितीत अनेक लोक घाबरतात आणि हार मानतात. मात्र, संयमाने ठोस निर्णय घ्यायला हवा, असे योगी म्हणाले.