सर्बियाच्या संसदेत फेकले ग्रेनेड; खासदार गंभीर

सर्बियाच्या संसदेत विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. तसेच एकापाठोपाठ स्मोक ग्रेनेड आणि अश्रुधुरांचे गोळे फेकले. यामुळे अधिवेशनात एकच गोंधळ उडाला. यात दोन खासदार जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे. खासदार एकमेकांच्या अंगावर धावून गेले. तसेच एकमेकांना मारहाणही केली.

संसदेतील दृश्य एखाद्या युद्धभूमीवर बॉम्बस्फोट झाल्यासारखे दिसत होते. सगळीकडे धूर पसरला होता. तसेच घोषणाबाजी करण्यात येत होती. संसदेच्या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण सुरू असताना विरोधी पक्षाच्या खासदारांनी गोंधळ घातला. दरम्यान, चार महिन्यांपूर्वी सर्बियातील रेल्वे स्थानकात छत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर सरकारविरोधात आंदोलन सुरू झाले आहे.