चंद्रावर ‘ब्लू घोस्ट’ सुरक्षित उतरलं!

अमेरिकन कंपनी फायरफ्लाय एरोस्पेसचे ब्लू घोस्ट लँडर   चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरीत्या उतरले. चंद्रावर पोहोचणारे हे दुसरे खासगी वाहन आहे. चंद्रावर उतरल्यानंतर लगेचच ब्लू घोस्टने चंद्रावरून पह्टो पाठवायला सुरुवात केली.

फायरफ्लाय कंपनीने हे पह्टो त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले. 15 जानेवारी 2025 रोजी ब्लू घोस्ट मिशन फ्लोरिडा येथून लाँच झाले होते.  एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या  फाल्कन 9 रॉकेटद्वारे ब्लू घोस्ट अवकाशात पाठवण्यात आले. मोहिमेचा उद्देश पृथ्वीवरून चंद्रावर दिसणाऱ्या ‘सी ऑफ क्रायसिस’ या विशाल विवराचा शोध घेणे हा आहे.  ब्लू घोस्ट ही अमेरिकेतील उत्तर पॅरोलिना येथे आढळणारी काजव्याची एक दुर्मिळ प्रजाती आहे. काजव्याच्या प्रजातीवरून लँडरला ‘ब्लू घोस्ट’ असे नाव देण्यात आले.