संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा 90 दिवसांच्या आत निकाल लावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचा इशारा

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 90 दिवसांच्या आत निकाल द्यावा. नाही तर, अखिल भारतीय सरपंच परिषद रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय सरपंच परिषदचे अध्यक्ष्य जयंत पाटील यांनी सरकारला तिला आहे. संतोष देशमुख त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. यानंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट आहे. यावरच अखिल भारतीय सरपंच परिषदनेही आपला संताप व्यक्त करत सरकारला हा इशारा दिला आहे.

याचबाबत बोलताना सरपंच परिषदचे अध्यक्ष्य जयंत पाटील म्हणाले की, “संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर क्रूरतेचा कळस झाल्याचं दिसून येत आहे. राज्यातील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या दृष्टीने ग्रामस्थ म्हणजे त्यांचा धर्म असतो आणि सरपंच ही त्यांची जात असते. अशा प्रकरणामुळे गावखेड्यात काम करणारे लोकप्रतिनिधी अस्वस्थ आहेत. यामुळे अपहरण झाल्याचं माहित असूनही ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी योग्य पाऊले उचलली नाहीत, त्यांनाही सहआरोपी करावं.”

ते म्हणाले “याप्रकरणामध्ये मोजून 90 दिवसांमध्ये कोर्टाचा निकाल होईल, या पद्धतीची पाऊले शासनाने टाकावीत, अशी आमची मागणी आहे. अन्यथा अखिल भारतीय सरपंच परिषद संतोष देशमुख हत्या प्रकरणात रस्त्यावर येऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही, याची शासनाने जाणीव ठेवावी.”