व्हाइटहेडस् समस्येने त्रस्त असाल तर आता तुमची काळजी मिटली.. वाचा व्हाइटहेडस् काढण्याचे साधे सोपे उपाय

तेलकट त्वचेच्या लोकांना व्हाइटहेड्सच्या समस्येचा सामना करावा लागतो. ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स एकसारख्याच गोष्टी आहेत आणि ते चिकटलेल्या छिद्रांमधून तयार होतात. व्हाइटहेड्सवर उपचार करण्याचे बरेच नैसर्गिक मार्ग आहेत. व्हाईटहेड्स काढण्यासाठी आपण कोणते घरगुती उपाय अवलंबू शकता हे आपण बघूया.

 

 

बेकिंग सोडा आणि पाणी – एक चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात थोडेसे पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि हळूवारपणे मालिश करा. किमान 5-10 मिनिटे हे मिश्रण तसेच राहू द्यावे. नंतर पाण्याने तोंड धुवा. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा लावावे. नैसर्गिकरित्या व्हाइटहेड्स काढण्यासाठी बेकिंग सोडा सर्वात उत्तम पर्याय आहे.

 

लिंबाचा रस आणि दालचिनी पावडर – एका भांड्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा दालचिनी पावडर घ्या. त्याची चांगली  पेस्ट बनवा. हे व्हाईटहेड्स प्रभावित भागावर लावावे. काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. 15-20 मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

 

 

 

स्ट्रॉबेरी आणि तांदळाचे पीठ – 1 किंवा 2 ताज्या स्ट्रॉबेरी घ्याव्यात लहान तुकडे करून नीट मॅश करावे. त्यात एक चमचा तांदळाचे पीठ घालून मिक्स करावे. त्यानंतर चेहरा व मान या भागांवर हे मिश्रण लावावे. त्वचेला एक्सफोलिएट करण्यासाठी काही मिनिटांसाठी हलक्या हाताने मालिश करा. मिश्रण त्वचेवर 5-8 मिनिटे ठेवा. नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवावा.

ओटस् केवळ खाण्यासाठी नाही तर, चेहऱ्यासाठी सुद्धा आहे बेस्ट! वाचा

 

टी ट्री आॅइल आणि चंदन पावडर – एक चमचा चंदन पावडर थोडेसे पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. त्यामध्ये टी ट्री आॅइलचे काही थेंब घाला आणि सर्वकाही एकत्र करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि हळूवारपणे मालिश करा. काही मिनिटे असेच सोडा त्यानंतर पाण्याने धुवा. व्हाईटहेड्सचा नैसर्गिकरित्या उपचार करण्यासाठी आपण आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा हा पॅक लावु शकता.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)