Santosh Deshmukh Case – धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यात नैतिकतेचा ‘न’ ही नाही, सुप्रिया सुळे यांचा अजित पवारांवर निशाणा

कौटुंबिक हिंसाचार, हार्व्हेस्टरचे पैसे, पीकविमामध्ये केलेला भ्रष्टाचार याचा कशाचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी केलेला नाही. त्यांनी स्वतःच्या तब्येतीमुळे राजीनामा दिल्याचं ट्विट आहे. त्यांच्या पक्षाला आणि महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की? उपमुख्यमंत्री (अजित पवार) आणि छगन भुजबळ म्हणताहेत नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळचं आहे. नैतिकता म्हणून हा राजीनामा दिला आहे का स्वतःच्या तब्येतीमुळे दिला? ही विसंगती त्यांच्या मोठ्या नेत्याच्या आणि ज्यांनी राजीनामा दिला त्यात दिसून येते, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांनी केला.

Santosh Deshmukh संपूर्ण सरकारच बरखास्त झाले पाहिजे! आदित्य ठाकरे आक्रमक

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रातील फोटो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पाहिलेच असतील. तर 84 दिवस लागले या व्यक्तीचा राजीनामा घ्यायला. हा राजीनामा केंद्रबिंदू नाही. हे सगळे कटातील सहसूत्रधार आहेत. कृष्ण आंधळेचा सीडीआर द्या. हा कृष्णा आंधळे गायब होतोच कसा? सातवा खुनी गायब आहे. जेव्हा संतोष देशमुख यांची क्रूर हत्या चालली होती तेव्हा विष्णु चाटे, सुदर्शन घुले यांनी वाल्मीक कराडला फोन व्हिडिओ केले होते. वाल्मीक कराड यांनी फोन ठेवून स्वतःच्या फोनवरून धनंजय मुंडेंना फोन केलेला आहे. विष्णु चाटे, सुदर्शन घुले, वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे संतोष देशमुखांच्या हत्येवेळी त्याच अर्ध्या तासात एकमेकाला व्हिडिओ आणि फोन कॉल्स करत होते. याचा अर्थ काय काढायचा? 84 दिवस ही सगळी माहिती सरकारला माहिती होती की नाही? मंत्री म्हणतात आजारी आहे म्हणून राजीनामा दिला. हीच ती नैतिकता? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.

धडधडीत पुरावे असतानाही फडणवीस खोटं बोलत असतील तर…, संजय राऊत यांनी फटकारले

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळांना विचारायचं आहे की, तुम्ही म्हणालात नैतिकतेवर राजीनामा दिला आहे. पण ज्याने राजीनामा दिला ती व्यक्ती नैतिकतेचा न ही म्हणत नाहीये. आम्ही खरं काय समजायचं. राज्यातील जनता सुन्न झाली आहे. धक्क्यात आहे. राजीनामा नैतिकतेवर म्हणता मग 84 दिवसांनी नैतिकता सुचली? वाल्मीक कराड जेलमध्ये आहे, तिथले सगळे कॅमेरे बंद आहेत. वाल्मीक कराडला व्हिआयपी ट्रिटमेंट आणि कॅमेरे बंद, हे होतचं कसं? कुणाचं राज्य चाललंय? असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.