
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी आज तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. शिवसेनेचे सुनील राऊत यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी तालिका अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार शिवसेनेचे सुनील राऊत, भाजपकडून योगेश सागर, संजय केळकर, बबनराव लोणीकर, शिंदे गटाचे रमेश बोरनारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर, काँग्रेसचे अमित झनक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे बापू पठारे यांची निवड जाहीर करण्यात आली. यापूर्वी महायुती सरकारने तालिका अध्यक्षपदी शिवसेनेला कधीही संधी दिलेली नव्हती. पण या अधिवेशनाच्या निमित्ताने शिवसेनेला प्रथमच संधी मिळाली आहे.