
शेअर बाजारातील कंपन्यांच्या लिस्टिंगमध्ये अफरातफर करून गुंतवणूकदारांच्या पैशाचा घोटाळा केल्याप्रकरणी सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी बूच यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. विशेष सत्र न्यायालयाने एसीबीला बूच यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून कारवाई टाळण्यासाठी बूच यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. हायकोर्टाने आज विशेष न्यायालयाच्या या आदेशावर तूर्तास कारवाई न करण्याचे निर्देश एसीबीला दिले असले तरी या प्रकरणावर मंगळवारी पुन्हा सुनावणी होणार आहे.