कोरेगाव-भीमा चौकशी आयोगास पुन्हा मुदतवाढ

कोरेगाव-भीमा येथे झालेल्या घटनेबाबत सेवानिवृत्त मुख्य न्यायाधीश जय नारायण पटेल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या चौकशी आयोगास पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी 28 फेब्रुवारी 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. आता त्यात आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ दिली असून, 31 मेपर्यंत मुदत असणार आहे. या आयोगाला राज्याच्या गृह विभागाने आतापर्यंत जवळपास 20 वेळा मुदतवाढ दिली आहे.