अनोख्या लग्नाची गोष्ट…10 वचनं, हुंडय़ात 11 हजार रोपं आणि बैलगाडीतून पाठवणी

लग्न म्हटलं की मोठी धामधूम, जास्त खर्च, पाहुणे, अनेक दिवसांची तयारी असे ठरलेलं असतं. काही जण पारंपरिक लग्नसोहळ्यापेक्षा साधेपणाने पण हटके लग्न करण्यावर भर देतात. अनावश्यक खर्च टाळून अनोखा संदेश देतात. उत्तर प्रदेशातील गाझियाबादच्या रईसपूर गावातील सुरविंदन किसन यांच्या अनोख्या लग्नाची चर्चा सर्वत्र होतेय.

सुरविंदर यांच्या लग्नपत्रिकेतील 10 आगळीवेगळी वचनं आहेत.  समाजातील बदल आणि साधेपणाचा संदेश देणारी ही वचनं आहेत. या लग्नात मुलीकडून हुंडा घेतलाय, पण तोही 11 हजार रोपांचा. पर्यावरण रक्षणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल आहे. नववधूची बैलगाडीतून पाठवणी केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर लग्नसोहळ्यादरम्यान ब्लड डोनेशन कॅम्प घेण्यात आला.  लग्न साधेपणाने करण्याचे आणि अनावश्यक खर्च टाळण्याचे एक उदाहरण आहे, जे सध्याच्या काळात खूप महत्त्वाचे आहे.