ओलाचा एक हजार कर्मचाऱ्यांना डच्चू

ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड कंपनी आपल्या एक हजारहून अधिक कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनीना झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कंपनीने कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला आहे. कर्मचारी कपात होणार असल्याने आज ओलाचे शेअर्स 5 टक्क्यांनी घसरले.

गेल्या सहा महिन्यांत ओलाचे शेअर्स जवळपास 52 टक्क्यांनी घसरले आहेत. ओला कंपनीला आर्थिक वर्ष 2024 ते 25 च्या तिसऱ्या तिमाहीत 564 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. ओला इलेक्ट्रिक मोबिलिटीची स्थापना 2017 मध्ये बंगळुरू येथे करण्यात आली होती.