लक्षवेधक – आजपासून वनप्लसचा ‘रेड रश डेज सेल’

वनप्लस कंपनीने आपल्या खरेदीदारांसाठी ‘रेड रश डेज सेल’चे आयोजन केले आहे. हा सेल उद्या 4 मार्चपासून सुरू होणार असून 9 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना फोनवर मोठा डिस्काऊंट मिळणार आहे. एक्सक्लुसिव्ह डिस्काऊंट, वेगवेगळय़ा बँक ऑफर्स आणि ईएमआय स्कीमवर सूट मिळणार आहे.

सद्गुरूंचा ऍप एक मिलियन डाऊनलोड

सद्गुरू यांच्या ‘मिराकॅल ऑफ माइंड’ या एआय ऍपला अवघ्या 15 तासांत एक मिलियनहून अधिक डाऊनलोड करण्यात आले. याचाच अर्थ या नव्या ऍपला दर तासाला 2778 लोकांनी डाऊनलोड केले आहे. हा ऍप इंग्रजी, हिंदी, तमीळ, रशियन, स्पॅनिश या भाषेचा सपोर्ट देण्यात आला आहे. हा ऍप अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा, यूकेसह 20 देशांत टॉपवर चालत आहे.

बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी

बँक ऑफ इंडियात पदवीधरांसाठी ऍप्रेंटिसपदाची भरती सुरू करण्यात आली आहे. 1 मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 15 मार्च 2025 पर्यंत अखेरची डेडलाइन आहे. बँकेत एकूण 400 पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांपर्यंत असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती bankofindia.co.in या वेबसाईट वर देण्यात आली आहे.

गांजामुळे आयआयटीयन बाबा पोलिसांच्या ताब्यात

आयआयटीयन बाबा ऊर्फ अभय सिंह यांच्याकडे गांजा आढळल्याने जयपूर पोलिसांनी ताब्यात घेतले. महाकुंभमध्ये अनेक साधूंकडे गांजा मिळतो. माझ्याकडेही थोडा प्रसाद (गांजा) पोलिसांना मिळाला. जर माझ्याविरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करायचा असेल तर पोलिसांनी जे लोक महाकुंभामध्ये गांजा पितात त्यांनाही अटक करायला हवी, असे बाबांनी म्हटले आहे.