
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case Update Today) यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असलेल्या वाल्मीक कराडला व्हीआयपी वागणूक मिळत असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांनी केला होता. यातच आता आणखी एक धक्कदायक माहिती समोर आली आहे. वाल्मीक कराड (Walmik Karad) असलेल्या जेलमधले सीसीटीव्ही (CCTV) अनेक दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी माहितीच्या अधिकारात याबाबत माहिती मागवली होती. ज्यातूनही धक्कदायक माहिती समोर आली आहे.
माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मीक कराड याला ज्या जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेज गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. फुटेज बॅकपसाठी जी यंत्रणा आहे, तिचीही केबल जळाली असल्याची माहिती समोर आली आहे. यातच पोलीस अधीक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या कंपनीला दुरुस्तीसाठीचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.