दापोलीत बेसुमार जंगलतोड; पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या महत्वाच्या बाबीकडे वन विभागाचे दुर्लक्ष

deforestation

दापोलीत बेसुमार जंगलतोड होत असली तरी पर्यावरणाचा ऱ्हास होणाऱ्या या महत्त्वाच्या घटनेकडे वन विभाग अधिकारी मात्र सोयीस्कररित्या या महत्त्वाच्या घटनेकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे. त्यामुळे वन विभाग अधिकाऱ्यांच्या आशीर्वादानेच जंगलतोड होत असल्याला दुजोरा मिळत आहे तसे नसते तर अवैध जंगलतोड तोड करणाऱ्यांवर लाकूड माफियांवर वन विभागाने कारवाईचा बडगा उगारला असता.

दापोली तालुक्यात अनेक ठिकाणी जंगलतोडीचे खूपच मोठे प्रमाण वाढले आहे. तरी मात्र वन विभाग विनापरवाना जंगलतोडीला लगाम घालण्यास सपशेल अपयशी ठरले आहे.