धक्कादायक! वर्षभरापासून नराधम बापच करत होता मुलीवर लैंगिक अत्याचार

नराधम बापानेच चौदा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना नांदेड सिटी परिसरात घडली. नांदेड सिटी पोलिसांनी नराधम बापाला अटक केली आहे. जुलै 2024 ते फेब्रुवारी 2025 या कालावधीत वेळोवेळी ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील आरोपी हा 45 वर्षांचा असून, त्याच्यासोबत भांडण झाल्याने पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे घरात वडील आणि मुलगी असे दोघेच राहत होते. आरोपीने मुलीला धमकी देत मारहाण करून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. याबाबत वाच्यता केल्यास मारण्याची धमकी दिली. दरम्यान, नोव्हेंबरमध्ये पत्नी परत आली. मात्र, पत्नी कामावर गेल्यानंतर आरोपी मुलीवर अत्याचार करायचा. दोन दिवसांपूर्वी बालहक्क समितीने या प्रकरणाची माहिती पुणे पोलिसांना दिली. त्यानंतर नांदेड सिटी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या. उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड तपास करत आहेत.