काखेतील काळे डाग घालवण्यासाठी करुन बघा भन्नाट घरगुती उपाय, महागडी प्रोडक्ट्स होतील फेल

अंडरआर्म्स काळे असल्यामुळे स्लीव्हलेस टॉप घालायला आपण कचरतो. त्यामुळेच आवडता स्लीव्हलेस ड्रेस घालू शकत नसाल, तर  नैसर्गिक घटकांपासून बनवलेले DIY मास्क काखेतील काळेपणा कमी करण्यात मदत करू शकतात. 
स्क्रब मास्क 
साहित्य
3-4 चमचे नारळ तेल
1 टीस्पून टूथपेस्ट
1 टीस्पून बेकिंग सोडा

एका भांड्यात ३-४ चमचे खोबरेल तेल घ्या. आता त्यात टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा घाला. ते चांगले मिसळा. तयार केलेला मास्क काखेत काळ्या भागावर लावावे. सुमारे 10-15 मिनिटे मास्क ठेवा. हलके ओले झाल्यावर हलक्या हातांनी घासून पाण्याने स्वच्छ धुवा. स्वच्छ टॉवेलने पुसून घ्या.

टीप: बेकिंग सोडा एक उत्तम एक्सफोलिएट आहे, यामुळे काखेतील काळेपणा कमी होतो. 

टोनिंग मास्क
साहित्य

कप बेसन
1 टीस्पून तांदळाचे पीठ
1 टीस्पून हळद पावडर
1 टीस्पून मध
1 टीस्पून दूध

एका वाडग्यात सर्व साहित्य नीट मिक्स करुन घ्या. सर्व मिश्रण फेटून चांगले मिक्स करा. तयार केलेला मास्क काखेत लावावा. किमान 10 ते 15 मिनिटे हा मास्क तसाच ठेवावा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून स्वच्छ करा.

टीप: बेसन मृत पेशी साफ करण्यास आणि त्वचेचा टोन समतोल करण्यास मदत करते.

डाळींचा स्क्रब
साहित्य
लाल मसूर पेस्ट किंवा मसूर डाळ
लिंबाचा रस
कप दूध

पद्धत
मसूराची पेस्ट एका भांड्यात घेऊन, त्यात लिंबाचा रस घालावा. यामध्ये दूध घालून, नंतर चांगले मिसळून घ्यावे. काखेत हा मास्क लावून किमान 10 ते 15 मिनिटे हा मास्क तसाच ठेवावा. नंतर थंड किंवा कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
टीप: मसूर डाळ एक उत्तम ब्लीचिंग एजंट आहे.

अॅलोव्हेरा जेल मास्क
साहित्य
कोरफड जेल किंवा मॉइश्चरायझर

पद्धत
तुमच्या काखेत एलोवेरा जेल किंवा मॉइश्चरायझर लावा. 5-10 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर धुवून
स्वच्छ पुसून घ्या. 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)