
जॉर्डनची सीमा ओलांडून बेकायदेशीररित्या दुसऱ्या देशात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका तरुणाचा सुरक्षा दलाच्या गोळीबारात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याबाबत जॉर्डनमधील हिंदुस्थानी दूतावासाने पोस्ट करत माहिती दिली आहे.
सध्या जॉर्डनमधील हिंदुस्थानी दूतावास त्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच त्या व्यक्तीच्या हिंदुस्थानातील कुटुंबियांशी देखील संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या व्यक्तीचा मृतदेह ताब्यात मिळाल्यानंतर त्याला हिंदुस्थानात पाठवण्यात येईल, असे दूतावासाकडून ट्विट करण्यात आले आहे.