
आहे. त्यानुसार पीडित तरुणी आणि गाडे हे एकमेकांच्या संपका&त नसल्याचे तांत्रिक तपासणीत उघडकीस आले आहे. परगावी निघालेल्या प्रवासी तरुणीकडे आरोपी दत्तात्रय गाडेने प्रवासी तरुणीकडे वाहक असल्याची बतावणी केली. त्यानंतर आवारात थांबलेल्या बसमध्ये तिच्यावर त्याने बलात्कार केला होता. गाडेला शुक्रवारी मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून अटक केली होती.
नराधम गाडेला न्यायालयाने 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने पोलिसांकडून विविध बाजूंनी तपास केला जात आहे. गाडे याच्यासह शिवशाही बसचा चालक-वाहकाचे जबाब नोंदविले आहे. गाडेची ससून रुग्णालयात डीएनए चाचणी करण्यात येणार आहेत. त्याच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. आरोपी गाडे वापरत असलेला मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून त्याची तांत्रिक तपासणी केली. तांत्रिक तपासणीत गाडे आणि पीडित तरुणी एकमेकांच्या संपका&त नसल्याचे उघडकीस आले आहे.
धमकी देऊन केला होता बलात्कार
नराधम गाडेने तरुणीला जिवे मारण्याची धमकी दिली होती. तरुणीने त्याच्याकडे गयावया केली. त्यानंतर गाडेने तिला धमकावून बसमध्ये दोनदा बलात्कार केला होता. पोलिसांनी शिवशाही बस न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविली असून गाडेविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे.