
उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार येत्या डिसेंबरपर्यंत मुख्यमंत्री होतील, असा दावा कर्नाटकातील काँग्रेस आमदार बसवराजू व्ही शिवगंगा यांनी रविवारी केला. शिवकुमार डिसेंबरपासून पुढील 7.5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करतील. पुढील विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचाच विजय होईल. डिसेंबरपर्यंत शिवकुमार नक्कीच मुख्यमंत्री असतील. तुम्हाला हवे असल्यास हे मी रक्ताने लिहून देऊ शकतो. जर त्यांनी डिसेंबरमध्ये पदभार स्वीकारला तर ते पुढील पाच वर्षांच्या कार्यकाळासह कारभार सांभाळतील. म्हणजेच 7.5 वर्षे ते या पदावर राहतील, असे शिवगंगा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.