
इस्रायलने गाझापट्टीत जाणारी सर्व प्रकारची मदत, विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आज रोखला. जर हमासने युद्धविराम कराराचा नवीन प्रस्ताव स्वीकारला नाही तर ही मदत यापुढेही गाझापट्टीत जाऊ देणार नाही, असा इशारा इस्रायलने दिला आहे. इस्रायल सध्याच्या युद्धविराम करारापासून भरकटण्याचा प्रयत्न करत आहे तसेच इस्रायलने गाझापट्टीतील पॅलेस्टिनींना देण्यात येणारी मदत रोखून युद्ध गुन्हा केल्याचा आणि कराराचा भंग केल्याचा आरोप हमासने केला आहे. युद्धविराम कराराचा पहिला टप्पा सुरू असून पहिल्या टप्प्यात मानवतावादी मदत किंवा सहकार्य करण्याचा करार शनिवारी संपला, परंतु दुसऱ्या टप्प्यातील कराराला अद्याप सुरुवात झालेली नाही.