मिंधे गटाच्या चेंबूर शाखेत दारूपार्टी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

शिवसेना शाखा म्हणजे शिवसैनिकांचे मंदिर. शाखेत प्रवेश करतानाही चपला उंबरठय़ाबाहेर काढून प्रवेश केला जातो. शिवसेना चोरणाऱ्या मिंध्यांनी मात्र शाखांचा बार करून टाकला. मिंध्यांच्या शाखांमध्ये दारूच्या पाटर्य़ा रंगत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

व्हायरल व्हिडीओ चेंबूर येथील मिंधे गटाच्या शाखेचा आहे. त्यात मिंधे आमदार मंगेश कुडाळकर यांचे कार्यकर्ते दारूपार्टीत दंग असल्याचे दिसत आहे. मिंधे गटाचे दीपक चव्हाण, संजय कदम आदी त्या पार्टीमध्ये सहभागी आहेत. एकमेकांना आग्रह करत पेगवर पेग रिचवले जात आहेत. टेबलांवर व्हिस्की, बिअरच्या बाटल्या आणि भरपूर चाखना दिसत आहे. पाठीमागे मोठा बॅनर दिसत आहे.