
दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी परभणीत पोलिसांच्या मारहाणीत मृत्युमुखी पडलेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि पँथर वाकडे बाबा यांना अजून न्याय मिळालेला नाही. याकडे अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आजपासून नाशिक ते मंत्रालय असा सर्वपक्षीय लाँग मार्च काढण्यात आला आहे. हा लाँग मार्च 10 मार्चला मंत्रालयावर धडकणार आहे. गेंड्याच्या कातडीच्या सरकारचा निषेध करण्यासाठी हा लाँग मार्च काढण्यात येत आहे, अशी माहिती मोर्चाचे प्रमुख आशीष वाकोडे यांनी दिली. लाँग मार्चमध्ये शिवसेना पक्ष संघटक विलास रुपवते, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते सागर संसारे, अशोक कांबळे, मंगेश पगारे, राहुल नानावरे यांच्यासह हजारो भीमसैनिक सहभागी झाले आहेत.