न्यायाधीशांनी स्वतःच्या पत्नीला 12 वर्षे पोटगी दिलेली नाही!

न्यायाधीशाने स्वतःच्या पत्नीला 12 वर्षे पोटगी दिली नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. न्यायाधीशाचे 2002 मध्ये लग्न झाले होते. त्यांनी पत्नीला 2013 मध्ये घरातून हाकलून दिले होते.  त्यानंतर पत्नीने फॅमिली कोर्टात धाव घेतली. आज 12 वर्षे उलटूनही  पत्नीला पोटगी मिळालेली नाही.

प्रयागराज हायकोर्टात शबाना बानोच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश विनोद दिवाकर म्हणाले, पत्नीच्या हक्काची जाणीव असलेल्या एका न्यायिक अधिकाऱ्याने पत्नीला पोटगी देण्याऐवजी तिला 12 वर्षे कायदेशीर कारवाईत अडकवले. कौटुंबिक न्यायालयाने पोटगी देण्याचे आदेश दिले होते. तरीही पोटगीची रक्कम देण्यात आलेली नाही. पतीने कायदेशीर प्रक्रियेचा गैरवापर केला आहे. त्याने पत्नीसोबत कायदेशीर लढाई सुरू ठेवून न्याय मिळण्यास विलंब केला. न्यायालय विनोद दिवाकर यांनी पत्नीलाही सहानुभूतीचा अधिकार असल्याचे सांगत सहा महिन्यांत 50 हजार रुपयांच्या खटल्याच्या खर्चासह संपूर्ण थकबाकीची रक्कम भरण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यायाधीश अली रझा आणि शबाना बानो यांचा विवाह 4 मे 2002 रोजी झाला होता. लग्नाच्या वेळी अली रझा दिवाणी न्यायाधीश होते. शबाना बानोच्या कुटुंबाने लग्नासाठी 30 लाख रुपये दिले होते. तसेच एक कार दिली होती. असे असतानाही त्याने 20 लाख रुपयांची अतिरिक्त मागणी केली होती. त्यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. त्याने 2013 साली पत्नीला घराबाहेर काढले होते.