
टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना दुबईमध्ये सुरू आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची फलंदाजी अगदीच सुमार राहिली. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि हार्दिकने केलेल्या फटकेबाजीमुळे टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
नाणेफेक गमावल्यानंतर टीम इंडियाला फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. प्रथम फलंदाजी करताना 300+ धावसंख्या करण्याची टीम इंडियाचा संधी होती. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अचूक मारा करत टीम इंडियाला सुरुवातीलाच मोठे हादरे दिले. 30 या धावसंख्येवर संघाच्या तीन विकेट गेल्या होत्या. रोहित (15), शुभमन गिल (2) आणि विराट कोहली (11 धावा) स्वस्तात माघारी परतले. परंतु त्यानंर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी खिंड लढवत संघाला मजबूत स्थितीम आणले. श्रेयसने 4 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 79 धावा चोपून काढल्या. तसेच अक्षर पटेलने सुद्धा 42 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंर फलंदाजीसाठी आलेल्या केएल राहुल (23) आणि रविंद्र जडेजा (16) यांनी धावसंख्येत किंचीत भर घातली त्यामुळे टीम इंडियाला 9 गड्यांच्या मोबदल्यात 249 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले.
न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने भेदक मारा करत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबुत धाडला. त्याने 42 धावा देत सर्वाधिक 5 विकेट घेतल्या. तसेच जेमीसन, ओरोर्क, सँटनर आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली