
>> योगेश जोशी
आजचे पंचाग
तिथी -फाल्गुन शुद्ध पंचमी
वार – मंगळवार
नक्षत्र – भरणी
योग – ऐंद्र
करण – कौलव
राशी – मेष
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. प्रथन स्थानात चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढणार आहे.मात्र, व्यय स्थानात राहू असल्याने अनावश्यक खर्च वाढू शकतो. तसेच विनाकारण दडपण जाणवणार आहे. दिवस आनंदात घालवण्यासाठी ताणतणावापासून दूर राहण्याची गरज आहे. बोलण्यात संयम ठेवा. आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. द्वितीय स्थानात गुरु असल्याने कुटुंबीयांचे सहकार्य लाभणार आहे. एखादा मित्र किंवा नातेवाईकांची भेट होण्याचे योग आहेत.
वृषभ
वृषभ राशीचे लोकांनी आज विनाकारण खर्च टाळण्याची गरज आहे. व्यय स्थानात चंद्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. तसेच आय स्थानात राहू असल्याने अचानक धनलाभाचे योग आहेत. प्रथम स्थानात गुरु असल्याने कोणतेही काम आत्मविश्वासाने पूर्ण कराल. नोकरीत बदली, बढतीचे योग आहेत. सकारात्मक विचार ठेवल्यास प्रगतीचे मार्ग खुले होतील. हातात आलेल्या पैशांची योग्य गुतंवणूक केल्यास भविष्यात फायदा होणार आहे.
मिथुन
मिथुन राशीला आज नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, एकादश स्थानात चंद्र असल्याने उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. दशम स्थानात राहू असल्याने सुस्ती, आळस जाणवणार आहे. तसेच कार्यक्षेत्रात कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. मन प्रसन्न ठेवल्यास दिवस आनंदात जाणार आहे. भाग्य स्थानातील शनिमुळे त्रास कमी होणार आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे. दशम स्थानात चंद्र असल्याने स्वतःवर काम ओढवून घेण्याची वृत्ती राहील. ते अडचणीचे ठरू शकते. नवम स्थानात राहू असल्याने ठरलेले बंत रद्द करावे लागतील. तसेच बऱ्याच बाबतीत नशिबाची साथ मिळणार आहे. मात्र, बोलण्यात संयम ठेवत वादविवाद टाळण्याची गरज आहे. अष्टम स्थानात शनी असल्याने जास्त दगदग टाळण्याची गरज आहे. तसेच प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना आज नशिबाची साथ मिळणार आहे. भाग्य स्थानातील चंद्रामुळे मन प्रसन्न राहणार आहे. बरेच दिवस रेंगाळलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. मात्र, अष्टम स्थानात राहू असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी, विनाकारण धावपळ-दगदग टाळण्याची गरज आहे. सप्तमातील शनीचा प्रभाव कमी होत असल्याने व्यवसायातील अडचणी कमी होत व्यवसायवाढीचा मार्ग मोकळा होणीर आहे. मात्र, जोडीदाराशी वाद टाळल्यास आजचा दिवस सकारात्मक जाणार आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांना आज संमिश्र असेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नये. अष्टम स्थानात चंद्र असल्याने साथीच्या रोगापासून दूर राहवे. तसेच दिवस कंटाळवाणा वाटत असेल तरी आळस झटकून कामाकडे लक्ष केंद्रीत केल्यास पुढील काळात कामाचा व्याप वाढणार नाही. सप्तम स्थानात राहू असल्याने जोडीदाराशी किंवा व्यवसायातील भागीदारांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानात शनी असल्याने स्पर्धापरीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.
तूळ
तूळ राशीच्या लोकांचा आजचा दिवस संमिश्र असेल. सप्तम स्थानात चंद्र असल्याने जोडीदार, साथीदार आणि कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. षष्ठ स्थानात राहू असल्याने गुप्तशत्रूंवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. गुंतवणुकीबाबतचे निर्णय काही दिवस पुढे ढकला. नकारात्मक विचार येत असले तरी कार्यक्षेत्रात मनासारखे काम मिळणार आहे. कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव राहणार आहे. व्यवसायाकडे लक्ष केंद्रीत केल्यास पुढील काळात त्याचा फायदा होणार आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस संयमाने वागण्याचा आहे. विनाकारण वादविवाद टाळावे लागतील. षष्ठ स्थानात चंद्र असल्याने मनावर दडपण येण्याची शक्यता आहे. मात्र, आता शनीच्या अडीचीचा प्रभाव कमी होत असल्याने मनासारखी कामे होणार आहे. मात्र, अतिआत्मविश्वास आणि अतिउत्साह टाळण्याची गरज आहे. पाचव्या स्थानातील शनीमुळे मुलांची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच एखादी नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी शिकण्यासाठी चांगला काळ आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना आज सकारात्मक परिणाम दिसतील. अनेक दिवस केलेल्या परिश्रमांचे फळ आता मिळणार आहे. पंचम स्थानात चंद्र असल्याने शिक्षण आणि मुलांसंबंधी शुभ वार्ता मिळणार आहेत. नवीन काही शिकण्यासाठी दिवस चांगला आहे. मात्र, चतुर्थ स्थानात राहू असल्याने कुटुंबियांशी वादविवाद टाळण्याची गरज आहे. तसेच तृतीय स्थानात शनी असल्याने सामाजिक क्षेत्रात मानसन्मान वाढण्याचे योग आहेत. अचानाक खर्च उभे ठाकणार असल्याने पैशांची तजवीज करावी लागण्याची शक्यता आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांना उत्साह जाणवणार आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने कुटुंबियांचे सहकार्य लाभणार आहे. कार्यक्षेत्रातही खेळीमेळीचे वातावरण असल्याने मन प्रसन्न असेले.आता साडेसातीचा अखेरचा टप्पा संपत आल्याने नैराश्य दूर होण्यास सुरुवात होणार आहे. एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे मन आनंदी होईल. तृतीय स्थानातील राहूमुळे भावंडाशी वादविवाद होणार नाही, याची काळजी घ्या. द्वितीय स्थानातील शनीमुळे आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज मानसन्मानाचे योग आहेत. तसेच कुटुंबासाठी आज जास्त वेळ द्यावा लागणार आहे. मात्र, स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. तृतीय स्थानात चंद्र असल्याने अचानक जवळच्या प्रवासाचे योग आहेत. हा प्रवास फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे. साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असल्याने नकारात्मक विचारांवर मात करत पुढे जावे लागणार आहे. दुसऱ्या स्थानात राहू असल्याने कुटुंब,सहकारी आणि मित्रांशी जुळवून घेतल्यास त्यांचे चांगले सहकार्य मिळण्याचे योग आहेत. तसेच अचनाक आर्थिक लाभाचे योग आहेत.
मीन
मीन राशीच्या लोकांनी मन प्रसन्न ठेवल्यास आजचा दिवस सकारात्मक असणार आहे. द्वितीय स्थानात चंद्र असल्याने पैशांची अडचण भासणार नाही. मात्र, प्रथम स्थानात राहू असल्याने मनावरील दडपण दूर करण्याची गरज आहे. साडेसातीचा पहिला टप्पा सुरू असल्याने संयम ठेवणे गरजेचे आहे. कुटुंबीय आणि सहाकाऱ्यांची मदत मिळणार आहे. आर्थिक दृष्टीनेही आजचा दिवस चांगला जाणार आहे.