लोकांना सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे, भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य

भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी देशातील जनतेबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”देशातील जनतेला सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य पटेल यांनी केले आहे.

”देशातील जनतेला सरकारकडे भीक मागायची सवय लागली आहे. नेतेमंडळी स्टेजवर आले की त्यांना हार घालायचे आणि हळूच त्यांच्या हातात मागणीचे पत्र सरकवायचे. हे चुकीचे आहे. मागण्यापेक्षा देण्याची वृत्ती ठेवा. मी खात्री देतो तुम्हाला की त्याने तुमचे आयुष्य सुखाचे होईल आणि तुम्ही एक चांगला समाज निर्माण होईल. ही जी भिकाऱ्यांची आर्मी आहे ती समाजाला कमकुवत बनवतेय. मोफत वस्तू मिळवणे हे एका चांगल्या महिलेचे लक्षण नाही”, असे पटेल म्हणाले.