
सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी हा आठवडा चांगला राहिला आहे. कारण या आठवडय़ात सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची घसरण झाली आहे, तर चांदी साडेतीन हजारांनी स्वस्त झाली आहे. 22 फेब्रुवारीला 24 कॅरेट सोने 86,092 हजार प्रति तोळा होते, ते 1 मार्चला 85,036 प्रति तोळा झाले आहे. तर चांदी गेल्या शनिवारी 97,147 रुपये प्रति किलो होती, ती आता 93,480 रुपयांपर्यंत खाली आली आहे. मुंबईत 22 कॅरेट सोने आता 79,400 रुपये प्रति तोळा झाले आहे.
97 व्या ऑस्कर अॅवॉर्डस्चे काऊंटडाऊन
दरवर्षी अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस् अॅण्ड सायन्सेजद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या ऑस्कर अॅवॉर्डस्चे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. अमेरिकेत 2 मार्च रोजी 97 वा पुरस्कार सोहळा होणार आहे, परंतु हिंदुस्थानात हा कार्यक्रम सोमवारी सकाळी 5.30 वाजेपासून स्टार मूव्हिज आणि जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. यंदाच्या ऑस्करचे होस्टिंग कॉमेडियन कॉनन ओब्रायन करणार आहे.
आयडीबीआय बँकेत 650 पदांसाठी भरती
बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आहे. आयडीबीआय बँकेने 650 पदांसाठी भरती सुरू केली असून अर्ज भरण्याची अखेरची मुदत 12 मार्च आहे. ज्युनियर असिस्टंट मॅनेजर पदासाठी उमेदवार किमान पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्याला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या पदासाठी ऑनलाइन परीक्षा असून त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रावर मोठी सूट
सॅमसंगचा प्रीमियम फ्लॅगशीप स्मार्टफोन सॅमसंग गॅलेक्सी एस 23 अल्ट्रावर 47 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. अॅमेझॉनवर या फोनची किंमत 1 लाख 49 हजार 999 रुपये होती. परंतु, आता हा फोन केवळ 78 हजार 999 रुपयाला मिळत आहे. म्हणजेच या फोनमध्ये तब्बल 71 हजार रुपयांची सूट मिळत आहे. या फोनमध्ये 12 जीबी पर्यंत
रॅम आणि 1 टीबीपर्यंत स्टोरेज मिळते.