सत्तेत येताच भाजप सरकारकडून वसुली सुरू! दिल्लीत पार्कसाठी 20 रुपये एन्ट्री फी, नागरिकांचा संताप

दिल्ली आम आदमी पार्टी म्हणजे अरविंद केजरीवाल यांचे सरकार सत्तेत असताना त्यांनी आरोग्यापासून ते इतर अनेक महत्त्वाच्या मूलभूत सुविधा माफक दरात आणि मोफत पुरवल्या. पण आता सत्ता दिल्लीत सत्ता बदल झाला आहे. सत्तेत येताच भाजप सरकारकडून द्वारका सेक्टर 16 मधील पार्कमध्ये प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. दिल्ली विकास प्राधिकरणाकडून (DDA) प्रत्येकी 20 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येत आहे. द्वारकामधील नागरिकांनी डीडीएच्या या निर्णयाला विरोध करत आंदोलन केले.

द्वारका सेक्टर 16 मधील पार्कमध्ये प्रवेशासाठी नागरिकांना 20 रुपये मोजावे लागणार आहेत. डीडीएच्या उपाध्यक्षांकून या संदर्भात सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. नागरिकांना 200 रुपयांत मासिक पास मिळणार आहे. तर ज्येष्ठांसाठी 100 रुपये मासिक शुल्क ठेवण्यात आले आहे. रोज येणाऱ्यांना 20 रुपये शुल्क द्यावे लागेल. या विरोधात नागरिकांनी आंदोलन केले. डीडीए हाय हाय…, तानाशाही नही चलेगी… अशा घोषणा देत आंदोलन केले.

स्थानिकांचा संताप

स्थानिक नागरिकांनी या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. पार्क हे सार्वजनिक स्थान आहे. या ठिकाणी प्रवेश शुल्क आकारणं अयोग्य आहे. या ठिकाणी लहान मुलं खेळतात आणि ज्येष्ठ नागरिक फिरायला येतात. पार्क शिवाय त्यांच्याकडे काहीच पर्याय नाही, असे द्वारका पीपल अपार्टमेंट आरडब्ल्यूए चे अध्यक्ष कोमल भाटिया म्हणाले.

सुविधांच्या नावाने शुल्क वसुली

36 एकरातील या पार्कमध्ये ओपन जिम, रनिंग ट्रॅक आणि झोके यासह इतर सुविधा आहेत. हा पार्क स्थानिकांसाठी एक आकर्षणाचं केंद्र आहे. काही दिवसांपूर्वी या पार्कमध्ये पुष्प महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पण अचानक पार्कसाठी प्रवेश शुल्क आकरण्यात आल्याने स्थानिकांमध्ये फसवणूक झाल्याची भावना आहे.