मुलीनेच काहीतरी केले असेल म्हणून लैंगिक अत्याचार झाला, तीन वर्षीय पीडितेबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे वादग्रस्त वक्तव्य

तामिळनाडूमधील मायिलादुथुराई जिल्ह्यात एका तीन वर्षीय चिमुरडीवर तिच्या 16 वर्षाच्या नातेवाईकाने लैकिंग अत्याचार केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी उघडकीस आली. त्या मुलीने नराधमाला विरोध केल्याने त्याने तिला बेदम मारहाणही केली. सध्या तिच्यावर आय़सीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेबाबत बोलताना मायिलादुथुराई जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एपी. महाभारती यांनी पीडित चिमुरडीबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”मुलीनेच काहीतरी केले असावे, तिच्या वागण्यामुळेच तिच्यावर लैगिंक अत्याचार झाला असावा”, असे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.

”मला मिळालेल्या रिपोर्टनुसार घटनेच्या दिवशी सकाळी ती मुलगी मुलाच्या तोंडावर थुंकली होती. ते कदाचित कारण असू शकते. आपण दोन्ही कडचं म्हणने समजून घ्यायला हवे”, असे महाभारती म्हणाले.