
दिल्लीचे भाजप आमदार गजेंद्र यादव यांनी शुक्रवारी आम आदमी पार्टीचे संस्थापक अरविंद केजरीवाल व दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिषी मार्लेना यांच्याबाबात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणूकीची रामायणाशी तुलना करता गजेंद्र यादव यांना आतिषी यांना शूर्पणखा व केजरीवाल यांना रावण म्हटले आहे.
गजेंद्र यादव हे मेहरोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. निकालानंतर त्यांची मतदारसंघात पहिलीच सभा होत होती. त्यावेळी बोलताना त्यांची जीभ घसरली. ”रामायणात रावणाचा व कुंभकर्णाचा अंत झाला मात्र शूर्पणखा वाचली. तसंच या निवडणूकीत झालं आहे. अरविंद केजरीवाल व मनिष सिसोदीया यांचा राजकीय अंत झाला आहे तर आतिषी या जिंकल्या. त्या शूर्पनाखा आहेत.”, असे गजेंद्र यादव म्हणाले.