
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांची शुक्रवारी व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली. या भेटीच्या वेळी पत्रकारांसमोरच त्या दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झालं. यावेळी ट्रम्प झेलेन्स्कीवर भडकलेले दिसले. मात्र यावेळी त्यांनी आपले अमेरिकेसोबतचे संबंध पूर्वीसारखेच राहतील असेही सांगितले.
”अमेरिका युक्रेन संबंध हे दोन राष्ट्राध्यक्षांच्या पलिकडचे आहेत. रशियाच्या मोठ्या आणि आधुनिक लष्कराशी लढण्यासाठी आम्हाला वॉशिंग्टनची मदत लागणार आहे. पण माझी भूमिका चुकीची नव्हती त्यामुळे मी माफी मागणार नाही’, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
#WATCH | Washington, DC: US President Donald Trump says, “…Don’t tell us what we are going to feel. We are trying to solve a problem. Don’t tell us what we’re going to feel…You are in no position to dictate what we are going to feel…We are going to feel very good and very… pic.twitter.com/gBnK0b5Tcy
— ANI (@ANI) February 28, 2025
डोनाल्ड ट्रम्प व झेलेन्स्की यांच्यामध्ये झालेल्या चर्चेनंतर झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांचा शांतता प्रस्ताव नाकारल्याचे समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय मीडियासमोर बोलायला बसलेले असतानाच ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांच्यासोबत वाद घातला. तुम्ही लाखो लोकांच्या जीवनाशी जुगार खेळत आहात. तुम्ही तिसऱ्या महायुद्धाचा जुगार खेळत आहात. तुम्ही जे करत आहात ते देशाचा खूप अपमान करणारे आहे. तुमचा देश मोठ्या संकटात आहे. तुम्ही हे युद्ध जिंकताना दिसत नाही. तुम्हाला यातून बाहेर पडण्याची खूप चांगली संधी आहे.” असे ट्रम्प म्हणाले.
या वादानंतर झेलेन्स्की हे तत्काळ तेथून निघून गेले. दरम्यान ट्रम्प यांच्या अधिकाऱ्यांना झेलेन्स्की यांना तेथून निघून जाण्यास सांगितल्याचे समजते. या प्रकारानंतर ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट शेअर केली. ” तुम्हाला शांतता हवी असेल तेव्हा तुम्ही पर येऊ शकता”, असे त्यांनी झेलेन्स्की यांना उद्देशून पोस्ट केले आहे.