पाकिस्तानात बॉम्बस्फोट; 5 ठार

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मशिदीत आज दुपारी नमाज पठणावेळी झालेल्या स्फोटात पाच ठार झाले तर 20 जण जखमी झाले. नमाज पठणासाठी मोठय़ा संख्येने लोक मशिदीत जमले होते. त्याचवेळी भीषण स्फोट झाला. मौलाना हमिदूल हक्कानी यांना लक्ष्य करण्यासाठी स्फोट घडवून आणला गेला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. हक्कानी जामिया दारूल उलुम हक्कानी आणि जमाते उलेमा ऐ इस्लामचे प्रमुख  आहेत.