
राज्यातील पाच विशेष पोलीस महानिरीक्षकांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांच्या नव्या नियुक्तीचा आदेश आज गृहविभागाकडून जारी करण्यात आला.
यशस्वी यादव – अपर पोलीस महासंचालक (सायबर), सुहास वारके- अपर पोलीस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा), अश्वती दोर्जे- अपर पोलीस महासंचालक (महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग), छेरिंग दोर्जे- अपर पोलीस महासंचालक (विशेष अभियान), के मल्लिकार्जुन प्रसन्ना – अपर पोलीस महासंचालक (प्रशासन).