Crime News – 25 लाखांची रोकड लंपास करणारा गजाआड

25 लाखांची रोकड चोरी करून पळून गेलेल्या वाहनचालकाला खेरवाडी पोलिसांनी अटक केली. गुरुदेव पाटील असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 23 लाख 72 हजार रुपये जप्त केले.

तक्रारदार हे विकासक आहेत. त्यांच्या पंपनीचे वांद्रे परिसरात कार्यालय आहे.  त्याच्याकडे तो दहा महिन्यांपासून वाहनचालक म्हणून काम करत होता. गेल्या आठवडय़ात त्यांनी कामानिमित्त कार्यालयात 25 लाखांची रोकड आणली होती. ही पॅश घेऊन ते आधी वाकोला आणि नंतर वांद्रे येथील म्हाडा कार्यालयात गेले होते. यावेळी त्यांनी ती पॅश कारच्या मागच्या सीटवर ठेवली होती. म्हाडा कार्यालयात जाताना त्यांनी पैशाबाबत गुरुदेवला सांगून लक्ष ठेवण्यास सांगितले होते. दुपारी ते काम संपवून कारजवळ आले असता गुरुदेव हा पैसे घेऊन पळून गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी खेरवाडी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासासाठी पथक तयार केले. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 23 लाख 72 हजार रुपये जप्त केले. त्याच्याविरोधात गुन्हे दाखल आहेत.

मोबाईल हिसकावून नेला

सॉफ्टवेअर डेव्हलपर असलेला मंगेश दास (33) हा तरुण मंगळवारी सकाळी टिळक नगर कॉलनी परिसरात मोबाईल बघत उभा असताना दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याचा मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी त्याने तक्रार देताच टिळक नगर पोलिसांनी तत्काळ तपास करत त्या दोन्ही चोरांच्या मुसक्या आवळल्या.

मेल-एक्स्प्रेसमध्ये चोरी करणाऱ्याला अटक

लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खेचून चालत्या ट्रेनमधून उतरून पळून जाणाऱ्या चोरटय़ाला कुर्ला रेल्वे पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. अन्वर हुसैन शेख असे त्याचे नाव आहे. त्याच्या अटकेने चार गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तक्रारदार हे रत्नागिरी येथे राहतात. 2 फेब्रुवारीला ते लोकमान्य टिळक टर्मिनस ते खेड असा नेत्रावती एक्स्प्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास करत होते. ही एक्स्प्रेस विद्याविहार रेल्वे स्थानकात येताच त्यांच्या वयोवृद्ध आईच्या गळय़ातील सोन्याची बोरमाळ एका आरोपीने खिडकीतून हात टाकून खेचून पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी कुर्ला रेल्वे पोलिसात तक्रार केली होती.