कियारा-सिद्धार्थ यांनी इन्स्टावरून दिली ‘गुड न्यूज’

बॉलीवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. कियाराने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत लवकरच आम्ही दोघे आई-बाबा होणार असल्याचे म्हटले आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी इन्स्टावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, आमच्या आयुष्यात लवकरच एक सर्वात मोठे गिफ्ट येणार आहे. पोस्टमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांनी आपल्या हातात एक विणलेल्या छोटय़ा बाळाचा मोजा ठेवला आहे. या पोस्टनंतर अभिनेत्री हुमा पुरेशी, नेहा धुपिया या सेलिब्रिटीसह या दोघांच्या अनेक चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 7 फेब्रुवारी 2023 रोजी या दोघांचे लग्न राजस्थानमधील जैसलरमेर येथे मोठय़ा धुमधडाक्यात पार पडले होते. या लग्नाचे पह्टो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल झाले होते. व्हिडीओत कियारा डान्स करताना दिसत होती तर सिद्धार्थही कियाराला साथ देत होता.