जगभरातील संपत्ती मूठभर लोकांच्या हाती, श्रीमंत आणि गरीबातील दरी वाढली,

जगभरात श्रीमंत आणि गरीबांमधील दरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. श्रीमंत लोक अधिक श्रीमंत होत चालले असून गरीब लोक हे अधिक गरीब होत चालले आहेत. जगात अब्जाधीशांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. त्यात आता ‘सुपरबिलियनेयर’ची नवी यादी समोर आली आहे. यामध्ये जगभरातील अशा अब्जाधीशांचा समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरहून अधिक आहे. यामध्ये हिंदुस्थानमधील उद्योगपती मुकेश अंबानी, गौतम अदानी, जेफ बेजोस, मार्प झुकरबर्ग वॉरेन बफे यांच्यासह जगभरातील प्रमुख उद्योगपतींचा समावेश आहे. या यादीत 24 सुपरबिलियनेयरचा समावेश आहे. त्यातील 16 सेंटी बिलियनेयर आहेत. सुपरबिलियनेयरच्या यादीत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एपूण संपत्ती 7.90 लाख कोटी रुपये आहे, तर गौतम अदानींची मालमत्ता 6.52 लाख कोटी रुपये आहे. श्रीमंत आणि गरीबातील दरी वाढत चालली आहे. अमेरिकेत सर्वात श्रीमंत 1 टक्के लोक देशाच्या एकूण संपत्तीच्या 30 टक्के वाटा बाळगतात.