
बेल्जियमची राजकुमारी एस्ट्रिड या उद्या शनिवारपासून आठ दिवसांच्या हिंदुस्थान दौऱ्यावर पोहोचणार आहेत. या दौऱ्यात त्या दिल्लीतील एका उच्चस्तरांवरील आर्थिक मिशनचे नेतृत्व करतील. तसेच 2 मार्च रोजी त्या आपल्या 65 प्रतिनिधींसोबत राजस्थानच्या बिझनौरचा दौरा करणार आहेत. त्यांच्यासोबत बेल्जियमचे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री यांच्यासह अधिकारी उपस्थित असणार आहेत. याचा उद्देश नवीन ऊर्जा, आरोग्य, विज्ञान, परिवहन क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्य वाढवणे हा आहे. बेल्जियमचे राजदूत डिडिएर वेंडरहासेल्ट यांनी यासंबंधी माहिती दिली असून या मिशनमध्ये बेल्जियमच्या प्रमुख पंपन्यांसह 326 अधिपृत प्रतिनिधी आणि उद्योगातील जाणकार उपस्थित राहणार आहेत.