
दोन वर्षांचा अकेत हार्दिक नाईक हा चिमुरडा त्यांच्या सुपर टॅलेंटमुळे चर्चेत आला आहे. इतक्या लहान वयात अकेत अनेक देशांचे झेंडे, पक्षी, प्राणी, सागरी जीव, फळे, भाज्या आदींचे प्लॅशकार्ड त्वरित ओळखतो. याबद्दल त्याच्या स्मरणशक्तीचे कौतुक होत आहे. या टॅलेंटसाठी चार रेकॉर्डस् त्याच्या नावावर जमा झाले आहेत. विरार येथील अकेत तीन महिन्यांचा असल्यापासून त्याची आई सुरभी नाईक यांनी त्याला फ्लॅशकार्ड ओळखायला शिकवले. अकेत 10 महिन्यांचा असताना त्याने 50 राष्ट्रांचे ध्वज अचूक ओळखले. याबद्दल त्याला पहिला पुरस्कार मिळाला.
वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड, सुपर टॅलेंटेंड कीड, मॅजिक बुक ऑफ रेकॉर्डचा इनव्रेडीबल मेमरी पॉवर अॅवॉर्ड-2025, कलाम वर्ल्ड रेकॉर्डचा एक्स्ट्राऑर्डनरी ग्रॅस्पिंग पॉवर जिनीयस कीड असे पुरस्कार एवढय़ा लहान वयात मिळाले आहेत. त्याची आकलन क्षमता लक्षात घेऊन सुरभी नाईक त्याला शिकवतात. 2023 रोजी विरार येथे अकेतने सर्वात जलद 50 देशांचे ध्वज ओळखण्याचा जागतिक विक्रम केला. त्याने 10 महिने 30 दिवसांच्या वयात 9 मिनिटे 26 सेकंदांत 50 देशांचे ध्वज ओळखून जागतिक विक्रम नोंदवला.