उत्तराखंडमध्ये चमोलीत हिमस्खलन, 57 कामगार अडकले; 16 जणांना सुखरुप बाहेर काढले

उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन होऊन 57 कामगार बर्फात अडकले. अपघातानंतर प्रशासन आणि बीआरओ टीम घटनास्थळी दाखल झाली. अडकलेल्यांपैकी 16 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उर्वरित कामगारांना वाचवण्यासाठी आयटीबीपी आणि गढवाल स्काउटची टीमकडून बचावकार्य सुरू आहे.

माना गाव आणि माना खिंडीदरम्यान सीमा रस्ते संघटनेजवळ हिमस्खलन झाल्याचे जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सांगितले. चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान कामगार हिमस्खलनाखाली दबले गेले. सर्वजण खासगी कंत्राटदाराचे कामगार होते. लष्करासोबतच आयटीबीपी, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या बचाव पथकही घटनास्थळी दाखल झाले आहेत.