तुम्हाला सुद्धा खूप राग येतो का! मग रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी या गोष्टी करा

 
राग येणं आरोग्यासाठी अजिबात चांगलं नसतं हे सगळ्यांनाच मान्य आहे, पण कधी कधी माणसाला काही गोष्टी इतक्या वाईट वाटतात की त्याला राग यायला भाग पडतं. रागामुळे स्ट्रेस हार्मोन्स अधिक प्रमाणात वाढतात. त्यामुळे ताण तणाव अधिक वाढतो, त्यामुळे तणाव वाढतो. अशा परिस्थितीत तुमचे बीपी देखील वाढू शकते, यामुळे ब्रेन स्ट्रोक आणि ब्रेन हॅमरेजची समस्या उद्भवू शकते. अशी परिस्थिती टाळण्यासाठी, स्वतःला आनंदी ठेवणे आणि राग कमी करण्याचा प्रयत्न करणे खूप महत्वाचे आहे.

योगासने करूनही रागावर नियंत्रण मिळवता येते. तुम्हालाही खूप राग येत असेल तर रोज योगा करण्याची सवय लावणे अधिक उत्तम. योगामुळे मन शांत होते त्यामुळेच क्रोधावरही नियंत्रण राहते.  याशिवाय व्यायाम केल्यानंतरही क्रोधावर नियंत्रण ठेवता येते. व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अनेक चांगले बदल घडतात. यातील मुख्य बदल म्हणजे व्यायामामुळे आपले स्ट्रेस हार्मोन्स मोठ्या प्रमाणात कमी होतात. 

असे म्हणतात की, ध्यान हा अनेक समस्यांवर उपाय आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता तेव्हा अनेक मोठे आजार तुमच्यापासून दूर होतात. याशिवाय, सर्वांना माहित आहे की जेव्हा तुम्हाला खूप राग येतो तेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्यायला हवा. जेणेकरुन असे केल्याने तुमचे बीपी वाढत नाही.
चांगले संगीत तुमचा मूड फ्रेश करते. म्हणजेच चांगलं संगीत ऐकलं तर कमी टेन्शन येईल. प्रेरक संगीत ऐकण्याचा प्रयत्न करा. यादरम्यान तुम्ही भक्तिगीतेही ऐकू शकता यामुळेही क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात यश येते. 
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)