
स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने पोलीस, महापालिका, पीएमपीएल तसेच एसटीच्या यंत्रणांना खडबडून जाग आली आहे. या घटनेने बसस्थानकांतील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, शिवाजीनगर आगार व्यवस्थापकांनी पोलिसांना पत्र देऊन सुरक्षा पुरविण्याची विनंती केली आहे. पीएमपीएल प्रशासनाने बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आहे, तर महापालिकेने स्वारगेट बसस्थानक परिसरातील अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई केली. अधिकृत पथारी व फेरीवाले व्यावसायिकांना सध्या आपले व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
बसस्थानक परिसरात महापालिकेची अतिक्रमण कारवाई
स्वारगेट एसटी स्टँडवर बलात्काराची घटना घडल्यानंतर महापालिका प्रशासनालाही जाग आली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू केली आहे. स्वारगेट एसटी स्टैंड परिसरातील रस्ता व पदपथावरील अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी-शर्तीचा मंग करणाऱ्यांवर कारवाई करून कॅरेट, शेड, टेबल, बांबू, लोखंडी काटा, ताडपत्री, मिक्सर आदी साहित्य जप्त केले आहे. तसेच सध्या स्वारगेट एसटी स्टैंड परिसरातील अधिकृत पथारी, फेरीवाले व्यावसायिकांना सध्या बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिले आहेत.
स्वारगेट एसटी स्टैंडलगत असलेल्या हातगाड्यांवर खाद्यपदार्थ विक्री केली जाते. या ठिकाणी अधिकृत फेरीवाल्यासंह महापालिका आणि पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने बेकायदा खाडापदार्थ विक्रेत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढली आहे. रात्रीच्या परिसरात खाद्यपदार्थ उपलब्ध होण्याचे हमखास ठिकाण असल्याने येथे पहाटेपर्यंत गर्दी असते. दारूड्यांसह टवाळखोर खाद्यपदार्थ, सिगारेट फुंकण्यासाठी टोळकेच्या टोळके असतात. मात्र, यावर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्याचे वारंवार समोर आले आहे. स्वारगेट एसटी स्टँडवर आत्याचाराची घटना घडल्यानंतर महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. तसेच, बारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत अआंबेडकर चौक ते वारजे फूल दोन्ही बाजूकडील रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर तसेच फ्रंट मार्जिनमधील व्यावसायिक यांच्यावर संयुक्त कारवाई करण्यात आली, या कारवाईत लोखंडी काऊंटर, फ्रंट मार्जिनवर कारवाई करत ३ टुक साहित्य जमा करण्यात आले. तसेच १० हजार ९५३ स्केअर फूट जागा कारवाईमध्ये मोकळी करण्यात आली. या दोन्ही कारवाया अतिक्रमण विभागाचे उपायुक्त संदीप खलाटे, बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप आव्हाड, महापालिका सहायक आयुक्त दीपक राऊत, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रणव दळवी, गणेश गिते, उपअभियंता चिंतामणी दळवी यांच्या सहकायनि करण्यात आली.
पीएमपीएल बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार
शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेले पीएमपीएल प्रशासनदेखील स्वारगेटच्या घटनेने खडबडून जागे झाले आहे. शहरात पीएमपीएलचे १५ डेपो आहेत, तर १५ पेक्षा अधिक मुख्य बसस्थानके आहेत. या बसस्थानकावरून रोज लाखो प्रवासी ये-जा करतात, त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने सर्व आगार व्यवस्थापक, ट्रैफिक कंट्रोलर यांना पत्र पाठवून सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे सांगितले आहे. पीएमपीएल डेपोंसह शहरातील गदींच्या प्रमुख स्थानकांवर सीसीटीव्ही बसवा, तसेच सहाः स्थितीतील सीसीटीव्हीची पाहणी करून ते नादुरुस्त असल्यास तत्काळ दुरुस्त करून घेण्याचे सांगण्यात आले आहे. सर्व आगार व्यवस्थापकांनी आपल्याकडील स्वमालकीच्या बसेस तसेच ठेकेदारांच्या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुस्थितीत असल्याची खात्री करावी. रात्रपाळी संपल्यानंतर बस पार्किंग करताना हॅण्डब्रेक, दरवाजे, खिडक्या बंद असल्याची खात्री करावी. महिला प्रवाशांची तक्रार आल्यास मार्गावरील चालक वाहकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पीएमपीएलचे सह व्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी दिला आहे.