
मुंबईतील भायखळ्यातील इमारतीला शुक्रवारी सकाळी भीषण आग लागली. अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भायखळा पूर्वेतील न्यू ग्रेड इन्स्टा मिलजवळील सॅलसेट इमारतीला सकाळी 10.45 वाजता आग लागली. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचेही वृत्त नाही.