
शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे स्क्वाफ नव्या उपक्रमाकरिता 128 विविध मानकांबाबत माहिती भरण्याच्या कामाला 15 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षांचे आयोजन, नववीपर्यंतच्या वर्गांची उजळणी सुरू असतानाच ही माहिती भरताना आणि तितकेच फोटो अपलोड करताना शिक्षक बेजार झाले आहेत. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) 28 फेब्रुवारीपर्यंत हे काम पूर्ण करण्यास सांगितले होते. यात शाळांमध्ये झालेली चर्चासत्रे, इयत्तानिहाय झालेल्या पालक सभा, वार्षिक नियोजन, खेळातून शिक्षण कथाकथन, अध्ययन निष्पत्तीवर आधारित उपक्रम, वृक्षारोपणासारखे उपक्रम, ईलार्ंनग साहित्याचा वापर, क्षेत्रभेटी, वेळापत्रक, मैदानी खेळ, आरोग्य तपासणी, दिव्यांगांना पुरविण्यात येणाऱया सुविधा अशा तब्बल 128 मुद्द्यांवरील माहिती व फोटो अपलोड करण्याचे काम शाळांवर सोपविण्यात आले आहे.